॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री
वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥
स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प
12 वे
★ आनंदनाथांचे अंधश्रद्धा निर्मूलन भाग - 01 ★
करिती कीर्तन सांगती पुराण । परि आत्मज्ञान नाही नाही
॥
स्वामी भक्तांनो,
काल
स्वामींच्या नावे बाजार मांडून भक्तांना लुटणाऱ्या, ढोंगी लोकांना प्रेमाचा हितोपदेश
देणाऱ्या, आनंदनाथ महाराजांनी आजच्या आपल्या अभंगातून, या ढोंगी लोकांना कसे ओळखायचे
? यांची लक्षणे कोणती ? याची माहिती दिलेली आहे.
हे
ढोंगी लोक खुप चाणाक्ष आणि चतुर असतात. यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे
असतात. बाहेरुन जरी हे लोक प्रेमळ, निरागस, निर्लोभी, कनवाळू आहेत, असे भासवत असले
तरी यांचे मुळ स्वरूप हे कपटी, पाताळयंत्री, लोभाचे भस्मासुर, वासनांध, पाषाणहृदयी
असते. हे पाखंडी लोक आपल्या बाह्य स्वरुपाने दुःखित, पिडीत, गरजू लोकांना आपल्या जाळ्यात
अलगद ओढतात व एकदा का तो पूर्णपणे अकिंत झाला की, मग यांचे मुळ स्वरुपातील कपटी डावपेच
सुरु होतात. यांचे हे राक्षसी रूप चाणाक्ष लोकांच्या लगेच ध्यानात येते. पण सुरुवातीला
श्रद्धेपोटी, अंधविश्वासामुळे याकडे दुर्लक्ष केल्या जाते.




