॥ श्री स्वामी
समर्थ ॥
लवकरच घेऊन येत
आहोत........
॥ श्री वटवृक्ष
स्वामी प्रस्तुत ॥
॥ श्री स्वाम वैभव
दर्शन भाग ०२ ॥
॥ श्री स्वामीसुताची
सत्यवाणी ॥
(श्री स्वामीसुत
तथा हरिभाऊ तावडे यांच्या अभंगवाणीवर केलेले अर्थपुर्ण विवेचन )
स्वामी भक्तांनो,
परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशिर्वाने मागिल काही
दिवसापूर्वीं आपण स्वामींचे अंतरंगीचे शिष्य श्री आनंदनाथ महाराज यांच्या अभंगाद्वारे
‘श्री स्वामी वैभव दर्शन भाग ०१’ मधून स्वामी महाराजांचे स्वरुप व त्यांचे सामर्थ्य
आणि अधिकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता ही परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ
महाराजांच्या कृपेने आपण ‘श्री स्वामी वैभव दर्शन भाग ०२’ च्या माध्यमातून स्वामींचे
आवडते शिष्य आणि लेकरु ‘स्वामीसुत महाराज उर्फ श्री हरिभाऊ तावडे’ यांच्या भावपुर्ण
रचनाद्वारे स्वामी महाराजांचे स्वरुप, शक्ती, सामर्थ्य आणि श्रेष्ठत्व जाणून घेणार
आहोत.
