॥
श्री स्वामी समर्थ ॥
श्री
वटवृक्ष स्वामी प्रस्तुत
॥
स्वामी वैभव दर्शन ॥
पुष्प
21 वे
परब्रह्म
स्वामी महाराजांची साधना कशी करावी ?
स्वामी भक्तांनो,
आनंदनाथ महाराजांच्या
अभंगवाणीद्वारे आपण आजगायत 20 पुष्पाद्वारे स्वामींचे स्वरूप दर्शन पाहितले, स्वामी महाराजांच्या
सर्वश्रेष्ठ आणि सर्वव्यापी अधिकाराचे दर्शन ही आपणाला झाले. स्वामींचे सेवा कशी
करावी ? अंधश्रद्धा कशी घालवावी ? याची ही माहिती आपण घेतली. स्वामी महाराज पूर्ण
परब्रह्म असून स्वामींची सेवा केल्यास ईतर काहीही करायची आवश्यकता नाही. याचे ही
ज्ञान आपण मिळवले. कर्मकांडाच्या अतिरेकापेक्षा शुद्ध भक्तिभाव स्वामींना अधिक
प्रिय आहे, याचीही इत्यंभूत माहिती आपण घेतली. स्वामींच्या कृपाशीर्वादाने अद्वेत
तत्वाला ही आपण स्पर्श केला आहे. ही सर्व माहिती जाणून घेतल्यामुळे जवळपास
आपल्याला मनातील स्वामी महाराजांच्या विषयी असलेले सर्व गैरसमज दूर होऊन,
स्वामींच्या सत्य आणि शुद्ध स्वरूपाचे ज्ञान आपल्याला निश्चितच झाले आहे.



















