आध्यात्माची आवश्यकता



                                                            आध्यात्माची आवश्यकता

            परमेश्वरावर श्रध्दा ठेवून, स्वत:च्या मनावर ताबा ठेवून, क्षणिक शारीरीक सुखाचा त्याग करून कामवासनेचा नाश आणि आध्यात्मिक सेवेचा प्रकाश नित्य मनात असावा. कधीही यशाला भारावून जाता अथवा अपयशाला डळमळता, यशाच्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होऊन पुन्हा कधीही अपयश येण्यासाठी उठता-बसता, जागता-झोपता,
चालता-बोलता, सुखात-दु:खात इतकेच काय परंतु स्वप्नात सुध्दा नित्य नियमितपणे खंड पडू देता, अखंडतेने परमेश्वराचा धावा करावा. त्याच्या चरीत्राचे गुणगाण करावे. घरात-दारात, प्रवासात, प्रत्येक कामात जो भेटेल त्याला ईश्वर नामाचा उपदेश करून दु: मुक्त करण्याचा प्रयत्न आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत करावा. ऐहिक सुख दु:खात गुंतता, फक्त पारलौकिक कल्याणाचा, आत्मानंदाचा विचार करून, या मानवी शरीराला शोभून दिसणारे चंद्र-सूर्याच्या अस्तित्वापर्यंत किर्ती  पसरविणारे कर्म करावे. इतर विषय वासना विकारात, व्यसनात आणि विनाशकारी संसारात गुरफटता मोक्षाची प्राप्ती होण्यासाठी संसाराचा एक सिडी म्हणून वापर करावा. तरच मोक्षाचा मजला गाठता येईल. वर्तमान काळात, सद्य स्थितीत याची फार आवश्यकता आहे.
            साधक शब्दाचा अर्थ फक्त स्वत:च्या फायद्याचा विचार करणे अथवा नित्य मंदिरात जाणे, दर्शन घेणे, पुजा, पाठ, आरती करणे एवढाच मर्यादित नसून तो खुप व्यापक आहे. साधक म्हणजे आकाशाप्रमाणे विशाल, वाऱ्याप्रमाणे सर्वव्यापक, सृष्टि प्रमाणे सुंदर, चंद्राप्रमाणे शितल, पाण्याप्रमाणे स्वच्छ, सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि अग्निप्रमाणे सर्वनाशी (विकृत्तीचा नाश करणारा) . गुणांचे प्रसंगानुरूप शिक्षण देऊन, त्यानुसार चालण्याची शक्ती, उर्जा आंतरीक सामर्थ्य देणारा आहे. साधक आकाशाप्रमाणे सर्वाना सामावून घेणारा असवा. वाऱ्याप्रमाणे सुख अथवा दु:खात सतत सोबत राहणारा असावा. सृष्टिप्रमाणे ईश्वराचे सौंदर्य दाखवणारा असावा. चंद्राप्रमाणे साक्षात यमासमोर ही शीतल निश्चल राहणारा असावा. पाण्याप्रमाणे आचरण शुध्द करणारा असावा. सूर्याप्रमाणे चारित्र्याचे तेज निर्माण करणारा तर अग्निप्रमाणे स्वत:च्या परिपुर्णतेने समाजातील दुर्गुंणांचा सर्वनाश करणारा असावा. साधक हा अवर्णनिय, अद्वितिय आणि आत्मशक्ती जागृत करणारा असावा.
            विश्वाची घडी व्यवस्थितपणे चालवणारा परमेश्वर हा सेवा, श्रध्दा, कतृत्व आराधना याने आपल्याला जवळ करतो.  सेवा म्हणजे समाज हित जोपासणे, श्रध्दा म्हणजे साध्यावरची निष्ठा एकाग्रता होय. कतृत्व म्हणजे साध्य प्राप्तीसाठी घेतलेली मेहनत किंवा परिश्रम होत, तर आराधना किंवा भक्ती  परमेश्वराची केलेली आळवणी  होय. या भक्तीनेच मोक्षाचे महाद्वार उघडते. स्वत:चे निश्चित असे स्थान सांगण्यासाठी प्रतिष्ठेसाठी घर असते. स्वत:च्या अब्रुसाठी वेगळेपणासाठी कपडे असतात, समाजात वावरण्यासाठी शिक्षण असते. शरीर रक्षणासाठी अन्न आणि पाणी असते. अगदि तशाच प्रकारे या सदैव भटकंती करणाऱ्या अस्थिर, अजर-अमर अशा आत्म्याला स्थिर करण्यासाठी मोक्षाच्या घरात स्थानापन्न करण्यासाठी आध्यात्माची फार आवश्यकता आहे.
             अशा प्रकारे आध्यात्म म्हणजे आत्म्याची स्थिरता होय. जोपर्यत आत्मा स्थिर होत नाही, तोपर्यत कितीही पैसा, ऐषोराम, नोकर-चाकर सुख देवू शकत नाहीत. हे सुख फक्त आध्यात्मामुळेच मिळते. म्हणुनच ईश्वराचे नामस्मरण करणारा शेतकरी  दिवसभर काबाड कष्ट करूनही रात्री सुखाची झोप घेतो, तर पैसेवाला दिवसभर आरामात राहूनही रात्रीच्या रात्री जागून काढतो. हा फरक फक्त आध्यात्माच्या अंगिकाराचा ईश्वर चिंतनाच्या सहवासाचा आहे. ही कायम जाणीव मनात ठेवून परमेश्वराची आराधना निस्वार्थी भावनेने करावी. सुदामाने निस्वार्थ पणाने सेवा करून कुबेराचे वैभव मिळवले मग आपण का बरे नाही मिळवू शकत ?



                                                      -   श्री. सुनिल कनले 


प्रज्ञापूरचे अक्कलकोट बनवणाऱ्या स्वामींचा सेवक !
अर्थात  बुध्दीचा अंहकार नष्ट करून ईश भक्तीची  ज्योत पेटवणाऱ्या
अक्कलकोटच्या  श्री  स्वामी  समर्थ महाराजांचा सेवकरी !