श्री स्वामी पारायण सेवा ई-बुक



।। श्री स्वामी समर्थ ।।
।। श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न ।।
।। श्री स्वामी चरित्र पारायण समूह भक्त मंडळ ।।
देवाधिदेव श्री स्वामी देवांच्या कृपाशिर्वादाने आणि स्वामी भक्तांच्या आग्रहास्तव सर्व स्वामी भक्तांना अधिक मासानिमित्त एक अप्रतिम भेट.....!
श्री स्वामी पारायण सेवा ई-बुक
         बऱ्याच दिवासाच्या प्रतिक्षेनंतर श्री स्वामी पारायण सेवा ई-बुक हे आज अधिक जेष्ठ शुक्ल पक्ष १०, शके १९४० वार- गुरुवार दि.२४/०५/२०१८ रोजी प्रकाशित केले आहे!
          या ई-बुक मध्ये श्री विष्णु बळवंत थोरात लिखित २१ अध्यायी श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी, श्री आनंदनाथ महाराज वेंगुर्लेकर विरचित अत्यंत प्रभावी श्री गुरुस्तवन स्तोत्र, श्री स्वामीचरित्र स्तोत्र, श्री स्वामीपाठ आणि श्री विश्वनाथ वऱ्हांडपांडे विरचित श्री तारक मंत्र याचा समावेश आहे !

            तसेच स्वामी महाराजांची सेवा कशी करावी ? स्वामी महाराजांची पूजा कशी करावी ? स्वामी चरित्राचे संकल्पयुक्त पारायण कसे करावे ? त्याचे नियम कोणते ? याबद्दल ही सविस्तर माहिती या ई-बुक मध्ये देण्यात आलेली आहे ! या सोबत स्वामी महाराजांच्या मूर्ती, प्रतिमा पूजन विषयी असलेले गैरसमज आणि त्यावरील स्पष्टीकरण ही यात दिलेले आहे !
         एकंदरित श्री स्वामी महाराजांच्या सेवेविषयी एक परिपूर्ण आणि आजगायत कधीही प्रकाशित न झालेली माहित देणारे हे एकमेव ई-बुक आहे ! यात स्वामी महाराजांच्या पूजाविधी सह श्री गुरुस्तवन आणि स्वामी स्तोत्र, स्वामीपाठ या सारख्या अत्यंत प्रभावी स्तोत्राची माहिती दिलेली आहे.
            तरी सर्व स्वामी भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, इतरांना ही याची माहिती द्यावी, जेणेकरून स्वामी सेवेचा प्रसार करण्याचे सत्कार्य घडेल आणि गरजू स्वामी भक्तांना स्वामी सेवेची परिपूर्ण माहिती मिळेल. तेव्हा याचा जास्तीत जास्त प्रचार करावा, ही नम्र विनंती...!
   ई-बुक व्हाट्सएप वर प्राप्त करण्यासाठी खालील स्वामी भक्तांना संपर्क करा, म्हणजे आपल्याला ते वैयक्तिक व्हाट्सएप वर पाठवले जाईल.....
०१. स्वामीदास सुनिल कनले
       +९१९७६७३७६२४६
       +९१८९९९९५६१६१
०२. स्वामीदास समीर भास्करे
       +९१७७२००५२३६९
०३. स्वामीदास कुलदीप महाराज
        +९१९७६७२७०९७९
श्री स्वामी पारायण सेवा ई-बुक डाऊनलोड करण्यासाठी