॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥



॥ श्री स्वामी समर्थ ॥
लवकरच घेऊन येत आहोत........
॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रस्तुत ॥
॥ श्री स्वाम वैभव दर्शन भाग ०२ ॥
॥ श्री स्वामीसुताची सत्यवाणी ॥
(श्री स्वामीसुत तथा हरिभाऊ तावडे यांच्या अभंगवाणीवर केलेले अर्थपुर्ण विवेचन )
स्वामी भक्तांनो,
परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशिर्वाने मागिल काही दिवसापूर्वीं आपण स्वामींचे अंतरंगीचे शिष्य श्री आनंदनाथ महाराज यांच्या अभंगाद्वारे ‘श्री स्वामी वैभव दर्शन भाग ०१’ मधून स्वामी महाराजांचे स्वरुप व त्यांचे सामर्थ्य आणि अधिकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता ही परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपण ‘श्री स्वामी वैभव दर्शन भाग ०२’ च्या माध्यमातून स्वामींचे आवडते शिष्य आणि लेकरु ‘स्वामीसुत महाराज उर्फ श्री हरिभाऊ तावडे’ यांच्या भावपुर्ण रचनाद्वारे स्वामी महाराजांचे स्वरुप, शक्ती, सामर्थ्य आणि श्रेष्ठत्व जाणून घेणार आहोत.

येत्या चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजेच ‘गुढी पाडव्याच्या’ शुभ मुहूर्तावर दि.१८ मार्च २०१८ वार रविवार पासून, आपण ही नविन लेखमाला फेसबुक आणि व्हॉट्सॲप च्या माध्यमातून प्रकाशित करणार आहोत. पहिला लेख गुढी पाडव्याला दि.१८ रोजी तर दुसरा लेख 'श्री स्वामी प्रकट दिन किंवा जयंती महोत्सव' ला दि.१९ मार्च रोजी प्रकाशित होईल. त्यानंतर मात्र प्रत्येक तीन दिवसानंतर म्हणजेच दर चौथ्या दिवशी आपण नविन लेख प्रकाशित करणार आहोत.
हे लेख जर आपल्याला आपल्या व्हॉट्सॲप वर पाहिजे असतील तर आपण आपल्या व्हॉट्सअप नंबरवरून पुढिल व्हॉट्सअप नंबर आपले नाव आणि आपला जिल्हा याचा मेसेज करावा. म्हणजे हे लेख आपल्याला व्हॉट्स अप नंबरवरून पाठविले जातील.
(कृपया लक्षात घ्या की, हा व्हॉट्सअप ग्रुप नाही तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर वैयक्तिकपणे हे लेख पाठविले जातील.)
अक्कलकोट निवासी पुर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची अचूक आणि योग्य माहिती पाहिजे असेल तर, आवर्जुन हे लेख वाचावे. ईतरांनाही हे लेख वाचण्यासाठी अवश्य सांगावेत. ही सुध्दा एक प्रकारची स्वामींची सेवाच आहे.
यासोबतच येत्या १९ तारेखेला ‘श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त’ श्री स्वामी वैभव दर्शन भाग ०१ मधील सर्व २४ लेख समाविष्ट असलेले एक ई-बुक पीडीएफ स्वरूपात सर्व स्वामी भक्तांना विनामुल्यपणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचा ही सर्व स्वामी भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा. ही नम्र विनंती.

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
लेखक :- स्वामीदास सुनिल कनले
संपर्क :- ९७६७३७६२४६
श्री वटवृक्ष स्वामी करीता
सर्वाधिकार लेखकाधिन